भारताच्या ३१५ मच्छिमारांची सुटकानवी दिल्ली: सरबजीतच्या सुटकेवरुन पाकिस्तानने घुमजाव केलं असलं तरी  भारताच्या ३१५ मच्छिमारांना मुक्त करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कराचीच्या जेलमध्ये भारताचे ३१५ मच्छीमार कैदेत आहे. २८ जूनला वाघा बॉर्डरच्या मार्गाने हे मच्छिमार भारतात परतणार आहेत.

मासेमारी करताना भारताची सीमा ओलांडून हे मच्छिमार पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. आज या मच्छिमारांना लाहोरमधील भारतीय अधिकाऱ्यांच्या हवाली केलं जाईल. त्यानंतर उद्या हे सर्व मच्छिमार आपल्या मायदेशी परततील.

पाकिस्तानच्या जेलमध्ये पाचशेहून अधिक मच्छीमार कैद आहेत. पाकिस्तान या मच्छिमारांना सोडण्यास तयार आहे मात्र त्यांच्या बोटी परत करण्याबाबत त्यांनी अजूनही मौन साधलंय.


article comments powered by Disqus