इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर बंदी घालण्यात आली आहे. महंमद पैगंबर यांची निंदा करणारा मजकूर प्रकाशित केल्याच्या आरोपावरुन ही बंदी घालण्यात आली आहे. ट्विटरची वेबसाइट रविवारी ब्लॉक केल्याची माहिती पाकिस्तानच्या दूरसंचार मंत्रालयाने दिली आहे.
मोहम्मद पैगंबर यांचे छायाचित्र पोस्ट करण्यासाठी फेसबुकने स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेबाबतचा मजकूर काढून टाकण्यास ट्विटरने नकार दिल्यामुळे ट्विटरवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारच्यावतीने मोहम्मद यासीन यांनी ही माहिती दिली.
आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्यासंबंधी फेसबुकने सहमती दर्शवली आहे. ट्विटरने मात्र याबाबत काहीही स्पष्टीकरण दिले नसल्याची माहिती यासीन यांनी दिली आहे.







