सानिया मिर्झालंडन: विम्बल्डनचा दुसरा दिवस भारतीय टेनिस चाहत्यांसाठी आनंदाचा ठरला. कारण सानियाने महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत शानदार प्रवेश केला आहे.

सानिया मिर्झाने आपली अमेरिकन पार्टनर बेथानीच्या साथीने रशियाच्या ऍल्ला कुद्रियाव्त्सेवा आणि अमेरिकेच्या स्टिफन्स जोडीवर मात केली. सानिया-बेथानी जोडीने ६-४, ६-२ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला.

तर दुसरीकडे विम्बल्डनच्या दुसऱ्या दिवशी अपेक्षेप्रमाणे निकाल पहायला मिळाले. राफेल नदाल, अँण्डी मरे आणि जोविल्फ्रिड त्सोंगा या स्टार्स टेनिस स्टार्सनी दुसऱ्या फेरीत एण्ट्री घेतली आहे.

स्पॅनिश बुल राफेल नदालाल ब्राझीलच्या बेलुचीने पहिल्या सेटमध्ये कडवी झुंज दिली. त्यामुळे राफाला हा सामना ७-६,६-२, ६-३ असा जिंकता आला. मरेला रशियाच्या डेवीडेन्कोवर ६-१, ६-१, ६-४ अशा फरकाने विजय मिळवला तर टी त्सोंगाने ऑस्ट्रेलियाच्या लेटन ह्युविटचा ६-३, ६-४, ६-४ ने धुव्वा उडवत दुसऱ्या फेरीत धडक मारली.

तर महिलांमध्ये अमेरिकेची नंबर वन सेरेना विल्यम्सने विम्बल्डनमध्ये शानदार सुरुवात केली. महिला एकेरीत सेरेनाने चेक रिपब्लिकच्या स्ट्राइकोवावर ६-२, ६-४ अशी सरळ सेटमध्ये मात केली. त्याचबरोबर पेत्रा क्वितोव्हाने उजबेकच्या अमनमुरादोवा ६-४, ६-४ अशी मात करत दुसरी फेरी गाठली.


article comments powered by Disqus