सानिया मिर्झानवी दिल्ली: लिअँडर पेस आणि महेश भूपती यांच्या वादात आपला वापर एखाद्या प्याद्यासारख्या झाल्याची भावना सानिया मिर्झाने व्यक्त केली आहे. या प्रकरणात केवळ पेस आणि भूपती यांच्याबाबतच नाही, तर ऑल इंडिया टेनिस असोसिएशनबाबतही तिने तीव्र नाराजी बोलून दाखवली आहे.

लंडन ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर लिअँडर पेस आणि महेश भूपती यांच्यातल्या वादात सानियाने पहिल्या दिवसापासून अळीमिळी गुपचिळीचं धोरण स्वीकारलं होतं. पण लंडन ऑलिम्पिकचं वाइल्ड कार्ड नक्की होताच सानियाने आपली तलवार उपसली आहे.

मात्र या प्रकरणी आयटाला आपला बचाव करता आलेला नाही. लंडन ऑलिम्पिकसाठीची निवड निव्वळ कामगिरीच्याच निकषावर झाल्याचं सांगून आयटाने निव्वळ वेळ मारून नेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे.


article comments powered by Disqus