जयंत पाटलांकडेही विलासरावांचे बोट
मुंबई: वादग्रस्त ‘आदर्श’ इमारतीला तत्कालीन महसूल मंत्री अशोक चव्हाण यांनीच मंजुरी दिल्याची साक्ष विलासराव देशमुख यांनी दिली आहे.
आदर्श घोटाळ्याप्रकरणी विलासरावांची कालपासून साक्ष घेण्यात येत आहे. कालच त्यांनी अशोकरावांकडे बोट दाखवलं होतं, त्यांनतर विलासरावांनी आज पुन्हा त्याची पुनरावृत्ती केली आहे.
आजच्या साक्षीमध्ये विलासरावांनी अशोक चव्हाणांशिवाय तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडेही बोट दाखवलं आहे.
आदर्श इमारतीचं लेटर ऑफ इंटेंड हे महसूल आणि अर्थ खात्यानं दिल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे. त्यावेळी महसूल मंत्री अशोक चव्हाण तर अर्थमंत्री जयंत पाटील होते. त्यामुळे या फाईल्स या दोन्ही खात्याकडून क्लिअर झाल्याचं विलासरावांचं म्हणणं आहे.
प्रशासकीय प्रक्रिया होत असताना आदर्श इमारतीची फाईल आधी महसूल खात्यानं मंजूर केली. त्यामुळे महसूल खात्यानं मंजूर केलेल्या फाईलची खुद्द मुख्यमंत्र्यांनी तपासणी करण्याची गरज नसते. त्यामुळे आदर्शला परवानगी ही महसूल खात्यानं म्हणजेच अशोक चव्हाणांनीच दिल्याचा आरोप केला.
शिवाय विलासरावांनी आपल्या साक्षीत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडेही बोट दाखवलं.







