मुंबई : २६/११ हल्ल्यातील आरोपी जबीउद्दीन अन्सारी उर्फ अबू हमजा ९ मई २००६ रोजी मुंबईतील आमदार निवासात थांबला होता. तसेच अबू हमजा उर्फ जबीउद्दीन हा दिल्लीत नाही, तर सौदी अरेबियातच सापडल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे.

इतकंच नाही तर त्याची ओळख पटवण्यासाठी सौदी अरेबियात त्याची डीएनए टेस्ट झाल्याचंही इंग्रजी वृत्तपत्रानं म्हंटलं आहे. गेल्या वर्षभरापूर्वीच अबू हमजा सौदीमध्ये असल्याची माहिती गुप्तचर संस्थांना होती.

अबू हमजाला ताब्यात घेण्यासाठी सौदी सरकारकडे प्रयत्नही सुरु होते. पण पाकिस्तानातल्या गुप्तचर संस्थांनी अबूचा ताबा भारताला देऊ नये यासाठी सौदी अरेबियावर दबाव टाकण्यास सुरुवात केला होती. पण डीएनए टेस्टनंतर अबू हमजाची ओळख पटली आणि सौदी अरब सरकारनं अबूचा ताबा भारताला दिला.

मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्याचं बीड कनेक्शन हे सर्वात आधई माझानंच उघड केलं होतं... शिवाय अबूच्या घराचा शोधही माझानं घेतला होता.

आणखी बातम्या

२६/११ हल्ल्यात सहभाग,हमजाची कबुली

मुंबई हल्ल्यातील आरोपीला अटक

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी


article comments powered by Disqus