लक्ष्मणराव ढोबळेंची माहिती

लक्ष्मणराव ढोबळेमुंबई: पावसाने दडी मारल्यामुळं राज्यातील धरणं आटत आहेत. त्यामुळं सध्या सर्व धरणांमध्ये केवळ १३ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे, अशी माहिती पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी आज दिली.

राज्यावर आलेल्या पाणीटंचाईच्या संकटावर आता पंढरीचा पांडुरंगच मात करू शकतो. राज्यातील दहा लाख जनताच पांडुरंगाकडे साकडं घालत नाही, तर राज्याचे मंत्री आणि प्रशासकही पांडुरंगाला पावसासाठी विनवणी करत आहेत, अशी हतबलता आज राज्याचे पाणीपुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे बोलून दाखवली.

महाराष्ट्रातील धरणं आटत चालली आहेत. गेल्या वर्षी आजच्या दिवशी राज्यभरातील  धरणांमध्ये २६ टक्के पाणीसाठा होता. पण आजमितीला राज्यातील सर्व धरणांमध्ये केवळ १३ टक्के साठाच असल्याचं उघड झालंय. त्यामुळे महाराष्ट्र भीषण पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर उभा असल्याचं ढोबळे यांनी म्हटलं आहे.

राज्यभरात पावसानं ओढ दिल्यानं भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यातल्या १० टक्केही पाऊस झालेला नाही. त्यामुळे लवकर पाऊस झाला नाही तर राज्यातील जनतेला भीषण पाणीटंचाईला सामोरं जावं लागणार आहे. शिवाय पाऊस असाच रुसलेला राहिला तर मोठ्या शहरातल्या बांधकामांसाठी लागणारं पाणी आणि मोठे हॉटेल्स आणि स्वीमिंग पूलना लागणाऱ्या पाण्यावर बंधनं घालण्याचे संकेतही ढोबळे यांनी दिले आहेत.


article comments powered by Disqus