चार डॉक्टरांसह नऊ जणांना अटक
कोल्हापूर: राज्यभरात स्त्रीभ्रूण हत्येनं खळबळ उडवली असताना, आता त्याचं लोण कोल्हापुरातही आलं आहे.
स्त्रीभ्रूण हत्याप्रकरणी कोल्हापुरातील चार डॉक्टरांसह एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.
शहरातील डॉक्टर संतोष मोरे, ज्ञानदेव दळवी, महिंद्र कानाडे, वैशाली कानाडे यांच्यासह अन्य पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
सामजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडेंच्या मदतीन कोल्हापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
कोल्हापूरमध्ये सोनोग्राफी मशिनला सायलंट ऑब्झर्व्हर यंत्रणा बसवली आहे. मात्र तरीही एजंटच्या माध्यमातून गर्भलिंग तपासणी आणि गर्भपाताचे प्रकार होत असल्याची माहिती देशपांडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी स्टिंग ऑपरेशनद्वाहे हा प्रकार उघडकीस आणला.







