घटस्फोटानंतरही पतीच्या घरावर हक्क मुंबई: घटस्फोट झालेल्या महिलेला आता पतीच्या घरातही हिस्सा मिळणार आहे. विवाह कायदे विधेयकातल्या सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळानं गुरुवारी मंजुरी दिली. या विधेयकात या सुधारणांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

या नव्या सुधारणांमध्ये पत्नीसह मुलांनाही हा अधिकार देण्यात आला आहे. घरावर हक्क सांगण्यासाठी पत्नीला न्यायालयात याचिका दाखल करावी लागेल. या आधारे फक्त विवाहकाळामध्येच नाही तर विवाहाच्या आधी घेतलेल्या घरामध्येही पत्नीला हिस्सा मिळेल.

दरम्यान घटस्फोटाच्या फेरविचारासाठी देण्यात येणारा ६ महिन्यांचा कालावधी रद्द करण्याचा प्रस्ताव या विधेयकात होता. पण त्याला मात्र मंजुरी मिळू शकली नाही. त्यामुळे ६ महिन्याचा कुलिंग पीरिअड कायम असणार आहे.


article comments powered by Disqus