उच्च न्यायालयाचे मत

बायकोने सीतेसारखं वागावं!मुंबई : सर्वाचा त्याग करून पती रामासोबत १४ वर्षे वनवासाला गेलेल्या सीतेचा आदर्श विवाहित स्त्रियांनी डोळ्यांसमोर ठेवावा, असं हायकोर्टाने म्हटलं आहे.

एका घटस्फोट याचिकेच्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने मंगळवारी हे विधान केलंय.

शिपिंग कार्पोरेशनच्या एका कर्मचाऱ्याची बदली मुंबईतून  पोर्ट ब्लेअरला झालीय.मात्र या कर्मचाऱ्याची पत्नी पतीसोबत पोर्ट ब्लेअरला जाण्यास तयार नाही. त्यामुळं बायकोविरोधात पतीने घटस्फोट याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती पी. बी. मजमुदार आणि अनुप मोहता यांच्या खंडपीठाने पत्नीला सीतेसारखे वागण्याचा सल्ला दिला.

या जोडप्याचा २००० साली विवाह झाला. मुळचे कोलकात्याचं असलेलं हे कुटंब गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतच राहते. त्यांना ९ वर्षांची मुलगी आहे.

२००५मध्ये पतीची पोर्ट ब्लेअरला बदली झाली. पण पत्नी तेथे जाण्यास राजी नसल्याने त्याने घटस्फोटाचा अर्ज केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ जूनला होणार आहे.


article comments powered by Disqus