अबू हमजाइस्लामाबाद: दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेला जबीउद्दीन अन्सारी उर्फ अबू हमजा हा भारताने पाकिस्तानला पाठवलेल्या यादीमधील इसम नाही, असं पाकिस्तान सरकारचे सल्लागार रहमान मलिक यांनी म्हटलं आहे.

जबीउद्दीनचा पाकिस्तानशी संबंध नाही, असं सांगत पाक सरकार हात झटकत आहे. पण मुंबई हल्ल्याच्या वेळी आपण कराचीमध्ये दहशतवाद्यांच्या कंट्रोल रुममध्ये उपस्थित असल्याचं जबीउद्दीनने चौकशी कबूल केल्याचं, गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितलं.

दिल्ली पोलिसांनी पकडलेला मुंबई हल्ल्याचा दहशतवादी जबीउद्दीन अन्सारीबाबत पाकिस्तानने कोलांटीउडी मारली आहे. पाक सरकारचे सल्लागार रहमान मलिक म्हणाले की, अबू हमजा नावाचे दोन व्यक्ती आहेत. पकडला गेलेला दहशतवादी हा भारताने पाठवलेल्या यादीतला नाही.


article comments powered by Disqus