नवी दिल्ली: २६/११ मुंबई हल्ल्यातील आरोपी जबीउद्दीन अन्सारीचा ताबा सध्या तरी मुंबई क्राईम ब्रान्चला मिळणार नाही. दिल्लीतल्या तीस हजारी कोर्टाने मुंबई क्राईम ब्रान्चची जबीउद्दीनच्या ताब्याची मागणी फेटाळून लावली आहे.
जबीउद्दीनचा ताबा मिळावा यासाठी मुंबई क्राइम ब्रान्चने कालच दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात याचिका दाखल केली होती. मुंबई हल्ल्याचा तपास करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रान्चला जबीउद्दीनची कोठडी हवी होती. त्याच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती मिळेल, अशी अपेक्षा क्राईम ब्रान्चला होती. पण दिल्ली पोलिसाचं विशेष पथक जबीउद्दीनची चौकशी करत असताना मध्येच त्याचा ताबा मुंबई पोलिसांना देता येणार नाही, असा निर्वाळा कोर्टाने दिला.
या प्रकरणी पुढीच सुनावणी पाच जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत जबीउद्दीनचा तपास दिल्ली पोलिसच करणार आहेत.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने जबीउद्दीनला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेतलं होतं.
जबीउद्दीनचा ताबा मुंबई पोलिसांना नाही







