आयआयटी पवईनवी दिल्ली: आयआयटीच्या प्रवेश परीक्षेचा वाद अखेर मिटला आहे. देशातील सर्व आयआयटी संस्थांनी २०१३पासून नव्या फॉरमॅटनुसार होणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी सहमती दर्शवली आहे.

आयआयटी कौन्सिलच्या आज झालेल्या बैठकीत एकच परीक्षा घेण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला.

आयआयटीसाठी वेगळी पूर्व परीक्षा द्यावी लागणार आहे. बारावीच्या पहिल्या २० टक्के गुणवंत विद्यार्थ्यांना ही प्रवेश परीक्षा देता येणार आहे.

देशात एकच सामायिक प्रवेश परीक्षा घेऊ नये अशी मागणी करत आयआयटी दिल्ली आणि कानपूरने या परीक्षेला विरोध केला होता. तसंच स्वतंत्र स्तरावर प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कपिल सिब्बल यांनी आधीच घेतलेला निर्णय कायम ठेवला आहे.

दरम्यान आयआयटी खडगपूर आणि गुवाहाटीच्या संस्थांनी एकच सामायिक प्रवेश परीक्षेचं समर्थन केलं होतं.


article comments powered by Disqus