नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये दोन पालकांच्या प्रसंगावधानानं एका स्कूल बसमधल्या ३५ विद्यार्थ्यांचे प्राण वाचलेत. नवीन पनवलेमध्ये रेल्वेचं फाटक बंद होत असतानाही, ड्रायव्हरनं बस घुसवण्याचा प्रयत्न केला. मात्र तेवढ्यात दोन्हीकडचे फाटक बंद झाले.

दोन्ही फाटक बंद झाल्यानं बस ड्रायव्हर घाबरला. त्यानं बस सोडून पलायन केलं. बस फाटकात अडकली होती, तेव्हा बसमध्ये ३५ विद्यार्थी आणि ९ पालक होते.

मात्र तिथून जाणाऱ्या संपत सुवर्ण आणि शीतल सुवर्ण या दाम्पत्यानं प्रसंगावधान दाखवलं आणि त्यांच्याकडे असणारी लाल कलरची छत्री मालगाडीला दाखवली. त्यामुळे ट्रेन थांबली आणि या विद्यार्थ्यांचे प्राण वाचले. हे सगळे विद्यार्थी नवीन पनवेलमधल्या सेंट जोसेफ स्कूलचे ज्युनिअर केजीचे विद्यार्थी होते.


article comments powered by Disqus