विद्यार्थी भारती आंदोलनमुंबई: नॉन-क्रिमी लेयर सर्टिफिकेट वेळवर मिळत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशाला उशिर होतो, याचाच निषेध करत विद्यार्थी भारतीच्या कार्यकत्यांनी आज मंत्रायलासमोर आंदोलन केलं.

आंदोलकांकडून यावेळी सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलक विद्यार्थ्यांना अटक केली आहे.

दहावी आणि बारावीचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी धडपड सुरु झाली आहे. त्यासाठी काहींना नॉन-क्रिमी लेयर सर्टिफिकेटही आवश्यक असलं. मात्र हे सर्टिफिकेट वेळेवर मिळत नसल्याने कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी उशिर होतो. त्याच्याविरोधातच हे विद्यार्थी भारतीने हे आंदोलन केलं.


article comments powered by Disqus