जळगाव: पावसाअभावी भाजीपाला उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून जळगाव जिल्ह्यात भाजीपाल्याचे दर चांगलेच वधारले आहेत.
कोथिंबीर १०० रुपये तर मेथी ७० रुपये किलोवर जाऊन पोहोचली आहे, फुलकोबी ४० रूपये वांगी ४० तर गवार ५० रुपये किलोवर पोहचलीय.
या वाढत्या दरांमुळे आधीच महागाईने हैराण असणाऱ्या सर्वसामान्य माणसांना रोजचं जेवण करणंही कठीण जाणार असं दिसतयं.
जून महिन्याचा शेवट आला तरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे भूजल पातळी चांगलीच खोल गेली आहे. त्याचा थेट परिणाम भाजीपाला उत्पादनावर झाला आहे. बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे साहजिकच भाजीपाल्याचा दर गगनाला भिडला आहे.







